सायबर क्राईम स्टोरी
काल मला संध्याकाळी साडे सहा वाजता मिस्टर अशोक शर्मा नावाच्या एका शरीफ माणसाने +919729149951 या नंबर वरून कॉल केला. आणि खालील प्रमाणे आमच्यात बोलणे झाले.
मी : हॅलो कोण बोलतंय
शर्मा : हॅलो आप गौरी उपासनी बोल रहा हो ना??
मी : हा
शर्मा : आपके husband ने निखिल उपासनी ने आपके नंबर पे मुझे ₹ 12,500/- ट्रान्स्फर करने के लिये बोला है. आपका कौनसा नंबर Paytm or GPay पे है??
(निखिल घरी नव्हते, कामात होते म्हणून सुरवातीला त्यांना काही विचारले नाही हा माझा मूर्ख पणा ठरला)
मी : यही मेरा नंबर GPay पे है.
शर्मा : मैं पेहेले आपको 10,000/- ट्रान्स्फर करता हू आपको मेसेज आयेगा चेक करो.
(नंबर कन्फर्म झाल्यावर मला 07988196396 या नंबर वरून खालील प्रमाणे मेसेज आला)
Rs.10000.00 credited to A/C
XXXXXXXXX0843on 15-09- 24 01:00:36: by A/C linked to VPA9130091718@ybl (UPI Ref No 3062754399000
मी : हा मेसेज आया है.
लगेच दुसरा मेसेज आला 07988196396
Rs.25000.00 credited to A/C
XXXXXXXXX0843on 15-09- 24 01:00:36: by A/C linked to VPA9130091718@ybl (UPI Ref No 3062754399000
शर्मा : अरे गलतीसे ज्यादा amount ट्रान्स्फर हुईं अब आप मुझे मेरे पैसे वापस करदो.
मी : हा तुरंत करती हुं.
शर्मा : आप call कट मत करो मैं जैसे बोलता हुं वैसे करो.
(त्याने कॉल चालू असताना GPay वरून पैसे ट्रान्स्फर कसे करायचे हे सांगितले पण मी केले नाहीत कारण GPay चा नंबर त्यांनी वेगळा सांगितला )
त्याप्रमाणे मी GPay वर टाकला तर नाव वेगळे येत होते.
मी : सर्व्हिस प्रोब्लेम आ रही है मैं 5 मिनिट मैं आपको पैसे भेजती हुं.
शर्मा : नही मैं दुसरा नंबर आपको बोलता हुं उस नंबर पे करो.
(त्याने दुसरा नंबर सांगितला पण तो पण नंबर चुकीचा वाटत होता म्हणून मी कॉल कट केला)
तेवढ्यात निखिल आले त्यांना विचारले तर ते म्हणाले मी कोणाला पाठवायला सांगितले नाही मग मात्र माझ्या मनात शंका आलीच की हा नक्कीच काहीतरी घोटाळा आहे.
परत लगेच त्या शर्मा ने मला कॉल केला मी निखिल ना दिला. ते बोलले तेव्हा त्यांना म्हणाला मला हॉस्पिटलला पाठवायचे आहेत.
तेव्हा तर सिध्द झालं की हा फेक कॉल होता.
मग लगेच मी माझ्या बँकेचा बॅलन्स चेक केला तर त्यात काहीच बदल झाला नव्हता. तेव्हा समजले की हे सर्व फेक होते. मी ह्याच्यातून वाचले.
हे सर्व मी फक्त आत्ता पर्यंत एकून होते जेव्हा हे प्रत्यक्ष माझ्या सोबत घडले तेव्हा मात्र काही वेळ पाय खालची जमीनच सरकली होती. त्यामुळं मित्र मैत्रिणींनो सावध रहा. आणि कोणत्याही फोन वर लगेच विश्वास ठेऊ नका. आधी सर्व माहिती कुठून मिळाली नक्की आपल्या महितीतलेच आहेत का हे पडताळून मगच ऑनलाईन transaction करा.
Comments
Post a Comment