अप्रतिम लेख
लग्न म्हणजे दोन मनं एकत्र येणं. दोन भिन्न व्यक्ती, भिन्न विचार, भिन्न सवयी आणि तरीही एकत्र जगण्याचा प्रयत्न. पण आजचं वास्तव काय सांगतं? थोडीशी अडचण आली, मतभेद झाले, गैरसमज वाढले... की नातं तुटतंय. "घटस्फोट" आता तो मुद्दा नॉर्मल झाला आहे, कारण नातं जपणं आता ‘डेअरिंग’ वाटतं! "आई-बाबांची अंधश्रद्धा पिढ्यांची फोड" आई मुलीला म्हणते "सहन करू नकोस... तुला त्रास होतोय ना? चल, घरी चल!" होय, मुलीला त्रास होत असेल तर तिच्या पाठीशी उभं राहणं योग्यच आहे. पण प्रत्येक भांडण ‘त्रास’ असतो का? कधीकधी भांडण हे नात्याचा ‘प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह’ असतं. प्रेम जसं हळूवार असतं, तसं भांडणं ही खरी असतात... पण त्यात समज आणि वेळ लागतो. "वाद नाही, संवाद हरवतोय" सध्या प्रत्येक नातं ‘तू चुकलास मी बरोबर’ याच चक्रात अडकलेलं आहे. दोघांनी संवाद साधायचा सोडून सल्लागार, आई-बाबा, मित्र-मैत्रिणींना मध्ये आणायला सुरुवात केली, की नात्याची खाजगी भिंत मोडते. माहेरचं पाठबळ असावं पण ते संकटातून सावरण्यासाठी, संसार तोडण्यासाठी नाही. "फॅमिली कोर्टचा रस्ता सहज झालाय!" हल्ली नवऱ्य...