बालपण

मला आवडते बालपणात रमायला 
आज्जीने सांगितलेल्या छान छान गोष्टी ऐकायला
आई ने दिलेला प्रेमळ मार आणि बाबांचा हात धरून रंकाळ्या च्या कठड्यावरुन चालायला आणि चालता चालता पाय घसरून पडायला
दादा बरोबर मस्ती करून रात्री गाणी म्हणत झोपायला
मला आवडते बालपणात रमायला

आई अंबाबाईच्या मंदिरात जाऊन बांगड्या भरायला 
शेजारच्या काकू कडे जाऊन नेलपेंट लावायला  आणि मेहेंदी काढून घ्यायला
कपाळावर रांगेबिरंगाची सजावट करायला आणि
हळदीकुंकवाला साडी नेसायला हट्ट करायला 
मला आवडते बालपणात रमायला

मे च्या सुट्टीत पोहायला आणि सायकलिंग करायला
तर दुपारी छप्पीं पाणी, विषमृत सारखे खेळ खेळायला
बॅडमिंटन , कॅरम, बुद्धिबळ खेळायला तर 
रात्री गच्चीत अंगतपंगत करून जेवायला 
मला आवडते बालपणात रमायला

संक्रांतीला तिळगुळ वाटतं फिरायला, 
दसऱ्याला आपट्याचे पण द्यायला
दिवाळीत किल्ला बनवून त्यावर रोज पाणी मारायला
आणि महाराज त्यांच्या सैनिकांना त्यावर आरुढ करून फटाके फोडायला 
गणपतीला सगळ्यांच्या घरच्या आरत्या झाल्या की मंडळाची आरती जायचो करायला
मला आवडते बालपणात रमायला 

१९.४.२०२५



Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख