नातं फक्त तुझे आणि माझे
नातं मनाशी मनाचे जोडलेले
बंधनातून मोकळं होऊन दिलखुलास गप्पात रंगलेल
असे नातं
न बोलता डोळ्यात पाहिल्यावर, भावना समजून कृती करणारं
आणि आनंद आश्रुंचा पाऊस पडणार असे नातं
तुम्ही च ' तू ' मध्ये रुपांतर झालेलं, मनापासून ओढ असणारं
शरीराने लांब असलो तरी मनाने एकरूप झालेलं
असे हे नातं
फक्त तुझे आणि माझे नातं.
Comments
Post a Comment