कर्माचे फळ
काही दिवसांपूर्वी मी एका नातेवाईकांकडे गेलेले. त्यांची परिस्थिती खाऊन-पिउन सुखी अशा पद्धतीची होती. तरी तिकडे गेल्यावर त्यांनी आमच्या आईकडे रडगाणी गायला सुरु केली. त्यात एक वाक्य त्या बोलल्या ते मनाला कुठेतरी बोचणार होत. "आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आज आमची कोणी किंमत करत नाही." ते ऐकल्या पासून माझ मन अस्वस्थ झालेलं. पण आज मात्र ते शांत झाल कारण फक्त पैशामुळे माणसाला किंमत प्राप्त होत नाही तर त्यासाठी कर्तृत्व सुधा लागत हे आज खूप विचारांती निष्कर्ष निघाला. पैसा हा चंचल आहे पण कर्तृत्व किवा कार्य हे मात्र अमर आणि अबाधित आहे. बाबा आमटे, मदत तेरेसा, सिंधूताई सपकाळ इ. आणि यांसारखे अजून बरेच लोक आहेत ते कर्तृत्वाने मोठे झाले आणि नंतर पैशाने. अगदीच विचार केला तर हल्लीच्या काळात पैशाला महत्व प्राप्त झालय पण आपणच कशाला किती महत्व द्यायचे हे ठरवून त्याप्रमाणे जर कार्य करत राहिलो तर आपल्याला पैसा नक्की कमी पडत नाही. गरजे पुरता पैसा असला तरी माणूस रडतो आणि जगाला दोष देत बसतो. ज्यातून काहीच सकारात्मक घडत नाही. फक्त त्रास होतो. आणि "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर" या उक्ती प्रमाणेच, जो जसे वागतो त्याला त्याचे योग्य तेच फळ मिळते. पण कर्माचे फळ हे त्याच्या कृतीवर आणि श्रद्धेवर अवलंबून असते हे नक्की. त्यामुळे फक्त पैशावर किंमत मोजली जात नसून त्यात कर्तृत्वाचा वाट सुधा तितकाच महत्वाचा आहे असे मला वाटते.
लेख दिनांक : २१ जानेवारी २०१५
अनुभवाचे बोल
त्यांच्या कडे आज पैसे आहेत पण माणसे नाहीत आणि जी आहेत ती विचारत नाहीत त्यामुळे पैसा असो किंवा नसो आपले काम आणि कर्तृत्व यावर आपले आयुष्य अवलंबून असते त्यामुळे ते चांगलेच करावे आणि स्वतः साठी करावे दुसरं काय म्हणेल तुला काय वाटेल असे विचार करत बसलो तर ते शक्य होणार नाही. स्वतः मधे काहीतरी करण्याची जिद्द असेल तर ते होतेच मग ते समोरच्याला जरी कष्ट वाटले तरी आपल्याला वाटत नाहीत एवढे मात्र नक्की.
Comments
Post a Comment