म्हातारपणीची व्यथा
सकाळी गरम गरम चहा घेतला आणि हॉटेल मधून बाहेर पडताना शेजारीच झाडाखाली एक आज्जी पाय पोटाशी घेऊन, मुटकुळे करून गारठ्यात कुडकुडत बसलेल्या दिसल्या.....त्या खूपच वयस्कर होत्या म्हणून त्यांना चहा नेउन दिला व सहज विचारले आज्जी कुठून आलात??? तेव्हा समजले त्या मुळच्या सातार्याच्या ,पुण्यात त्यांचा मुलगा कामानिमित्ताने राहतो म्हणून त्या पुण्यात आल्या तर जिथे त्यांचा मुलगा राहत होता तिथे आता तो राहत नाही, म्हणून त्या ज्यांच्या बरोबर पुण्यात आल्या होत्या त्यांच्याकडे एक ६-७ दिवस राहिल्या व तिथून मी आता गावी जाते अस खोट सांगून बाहेर पडल्या, त्या दोन दिवस अशाच कुठेतरी काहीतरी खाऊन, कुठेतरी झोपून दिवस काढत होत्या.... हे सगळे सांगताना त्यांचे डोळे पाण्याने भरून आले होते, पण त्यांचा जीवच इतका लहान होता कि त्यांना कुठे काम करून राहायला पण सांगता येत नवते कि राहायची सोय पण करू शकत नवते...... त्यांना मदत कशी आणि काय करावी हेच कळत नवते, मी विचारले, " आज्जी मग आत्ता कुठे जाणार कि गाव कडे जाणार ??" त्या म्हणाल्या, "पोरी कोनच गाव अन कोनच घर, अग गावाकडच्या घरात कोण बी नाई म्हणून इथ मुलाकड अनल त्या भल्या मानसाने तर पोर कसल ........... (शिवी) कुठ गेलाय पत्ताच न्हाय बघ त्याचा , आता असेच दिवस काढायचे आणि कधीतरी मारायचं" व्रधश्रमत कळवले तर तिथे पैसे आणि details शिवाय घेणार नाहीत, पोलिसात कळवले तर पोलिस ह्याच अज्जीना प्रश्न विचारून भडीमार करतील आधीच त्यांची तब्बेत म्हणजे तोलामासाची त्यात त्या पोलिसांना ह्यांची कसली काळजी असणार ...... खूप मोठा गहन प्रश्न पडला होता पण मी काहीच करू शकत नवते कारण स्वतःचा असे काहीच नाहीये अजून....... शेवटी पर्स मध्ये पैसे काढून त्यांना द्यावे असे वाटले म्हणून पैसे काढून त्यांच्या हातात ठेवले तर त्या बावचळल्या , गोंधळल्या , " पोरी च्या पाजून उपकार केलास हेच लई आहे, पैक देऊन अजून डोस्क्यावर वझकरू नकोस मला" हे वाक्य ऐकून तर डोळ्यांच्या कडा पाणावल्या..... मग फक्त त्यांना नमस्कार करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ तिथून निघाले खर पण मन मात्र त्यांच्याच पाशी घुटमळतय अजून.....
लेख दिनांक १२/२/२०१४
Comments
Post a Comment