मला आवडते भूतकाळात रमयला

मला आवडते भूतकाळात रमायला
आजीने सांगितलेल्या गोष्टी आणि आईने दिलेला प्रेमळ मार 
हे आठवत जगायला
मला आवडते भूतकाळात रमायला!

शाळेने शिकविलेले धडे व महाविद्यालयात मिळालेले अनुभव
यांची सांगड घालत, बदलत्या जगा बरोबर राहायला
मला आवडते भूतकाळात रमायला !

आजारपणात आईने घेतलेली काळजी आणि
डॉक्टरांकडे बाबांनी मारलेल्या चकरा
हे मनात साठवून परत आईच्या कुशीत शिरायला
मला आवडते भूतकाळात रमायला !

शेजारच्यानी दिलेले प्रेम आणि नातेवाईकांनी लावलेली माया
यांच्या आठवणींची उबदार शाल पांघरून झोपायला
मला आवडते भूतकाळात रमायला !

मित्र मैत्रिणींन बरोबर केलेले ट्रेकिंग आणि मारलेल्या तासनतास गप्पा ह्या नको कधीच पुसल्या जायला
मला आवडते भूतकाळात रमायला !

सुखी संसारातून वेळ काढून आपणच लिहिलेल्या १९८७ ते ९९ च्या डायऱ्या वाचायला
वाचता वाचता नवऱ्याला किस्से सांगून हसवायला 
मला आवडते भूतकाळात रमायला !

- सौ. गौरी साधले उपासनी

Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख