थकलेल्या माणसांना आणि पिकलेल्या पानाना कधीच दुखवायचं नसत

सासरची असो किंवा माहेरची सर्वजण माणसंच असतात
आपण ज्यांना जीव लावू ती पण आपल्याला जीव लावतात
काही चिडकी, काही रडकी तर काही घुमी असतात
काही समजूदार, काही शांत तर काही समंजस असतात.
सर्वांना आपल मानून वागणारी खूप कमी असतात
पण एकदा आपल मानलं की मग माणुसकी पण जपतात
मानापमनाच्या लोकांकडे लक्ष न दिलेेलच बर
आपलं काम आपण सचोटीने केलेल खरं
कामाशी काम ठेऊन पुढे चालत राहायचं
चढ उतार आले तरी माणसांना नाही सोडायचं
पिकल्या पानां सारखीच माणसे पण थकतात
पण आपल्याला आधार म्हणून आधारस्तंभ बनतात
आधारस्तंभ निखळतात तेव्हा जाणीव होते जबाबदारीची
पण खरच का आपण चालत असतो त्यांच्या मार्गा वरती?
कोणता मार्ग कोणती वाट तेव्हा काहीच सुचत नाही
म्हणून थकलेल्या माणसांना आणि पिकलेल्या पानांना कधीच दुखवायचं नाही.
- गौरी निखिल उपासनी
दिनाक २९/४/२०२३

Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख