कात्रज ते सिंहगड रात्रीचा ट्रेक
खरतर ट्रेक म्हंटल कि माझ्यात एकप्रकारचा उत्साह निर्माण होतो, तसेच काहीसे ह्या ट्रेक बाबतीत झाले होते. त्यात ह्या ट्रेकमध्ये ट्रेकप्रमुख (सागर) त्याच्या व्यतिरिक्त कोणाशीच ओळख नसल्यामुळे जरा मनात भीती होती कि कसा होईल ट्रेक????? पण पुण्यातून कात्रज बोगद्या पर्यंत पुण्यातील ट्रेकर्स ना एकत्रित पणे आणण्याचे काम माझ्यावर असल्यामुळे पुण्यातल्या सगळ्याच लोकांची ओळख झाली. त्यात पुण्यातून मी धरून ४मुली असल्यामुळे मी जरा relax झाले. आम्ही पुण्यातून संध्याकाळी ७वाजता निघालो, ७.३० ला बोगद्याच्या इथे पोहचलो. आम्ही पोहचायच्याआधीच कोल्हापूरहून कोल्हापूर हायकर्स चा पूर्ण ग्रुप आला होता. गेल्या गेल्या पहिल्यांदा प्रत्येकाला frooty ची बाटली देऊन ट्रेकची सुरवात झाली.
आमचा ट्रेक रात्री ८वाजत सुरु झाला. काळाकुट्ट अंधारात पण , चंद्राच्या प्रकाशातून आमच्या ट्रेकची सुरवात झाली. आम्ही कात्रज बोगद्य वरून चालत होतो, त्यामुळे रात्रीचे उजव्या बाजूला दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेलं पुणे शहर अप्रतिम दिसत होत. ट्रेक ला सुरवात करतानाचा माझा पहिला प्रश्न होता, " किती तासाचा ट्रेक आहे?". जेणे करून मनाची तयारी करूनच चालायला सुरवात केली. कारण ६तास मी आत्ता पर्यंत कधीच चालले नव्हते. त्यामुळे थोडी भीती वाटत होती कि ट्रेक complete होईल ना??? पण खात्री पण होती कि आत्ता पर्यंत केलेले ट्रेक कितीही कठीण असले तरी ते यशस्वी रित्या पूर्ण केलेत त्याच प्रमाणे हा हि होईल.
पहिले २ डोंगर चढताना आणि उतरताना फारसा त्रास झाला नाही पण भूक मात्र सनसनुन लागलेली. पण अजुन२-अजुन२च डोंगर असे करत ५ डोंगर पूर्ण पणे चढल्यावर एका पठारावर सगळ्यांना जेवणाची सूचना केली, तेव्हा खूप भारी वाटले. मग मात्र पटकन जेवायला बसलो. जेवन झाल्यामुळे थकवा पण नाहीसा झाला. मग तिथेच बर्याच नवीन लोकांच्या ओळखी पण झाल्यामुळे इथून पुढचा ट्रेक एकदम मज-मस्ती करत होणार होता ह्याची खात्री झाली. कारण कोल्हापूर हायकर्स चे सगळेच एकदम कुल आणि मस्त होते. जेवण झाल्यावर थोडी energy आली त्यामुळे त्यानंतरचा पहिला डोंगर मी व्यवस्थित cover केला. पण त्यानंतर परत मी दमल्यामुले माझी चाल कमी झाली. पण सांगलीच्या काकाची आणि सुनीलची मला खूप मदत झाली, कारण कात्रज ते सिंहगड साधारण १५-१८ डोंगर आहेत त्यातले ९ डोंगर पूर्ण झाल्यावर माझ्यात अजिबातच त्राण नव्हते पण मधेच ट्रेक सोडणे पण शक्यच नव्हते त्यामुळे का होईना पण माझा कात्रज ट्रेक तरी सकाळी ८ वाजता पूर्ण झाला त्यामुळे मी शरीराने जरी थकले असले तरी मनाने मात्र खूप खुश होते कारण ९०% ट्रेक मी पार केला होता. आता फक्त सिंहगड चढायचा बाकी होता, बाकीचे सगळे चालत आले पण मी मात्र गाडीतून सिंहगडावर गेले. खूप मस्त वाटले !!!
दिनाक: ३०/५/२००९
Comments
Post a Comment