जीवधनचा ट्रेक यशस्वीरित्या पार पडला

जानेवारी २०१४ उजाडला आणि ७वाजत माझी सकाळ झाली, थंडी इतकी होती कि पांघरुणातून बाहेर येणे पण मुश्किल झाले होते पण सुर्य देवाने डोक्यावर आगमन करायच्या आधी जीवधन चढणे आवश्यक होते त्यामुळे ७.३० पर्यंत तयार होऊन जीवधन कडे निघालो.......... जाताना जीवधन कडे एक नजर टाकली तेव्हा भीती नावाचा शत्रूने मनात आगमन केले..... कारण पायवाट पूर्ण खडी दिसत होती आणि एक rock patch आहे असे ऐकिवात होते त्यामुळे मला गडावर जाता येईल कि नाही हि मनात दाट शंका होती.......... पण जिथे पर्यंत जाणे शक्य होईल तिथे पर्यंत जायचे असे ठरवून चालायला सुरवात केली, मनात मारुतीरायाचा जप सुरु केला कि गडावर पोहचण्याची शक्ती मला दे............थोडेच अंतर गेल्यावर दमायला व्हायला लागले व मी दमून एका दगड वर बसले ................ तोपर्यंत मागून "गौरी चल, हळू हळू चालत राहा" असा आवाज आला आणि परत चढायला सुरवात केली पण मला पुढे जायची इच्छाच होत नव्हती पण तरी सचिन भुर्के आणि रोहन घाटगे यांच्या सहकार्याने वानरलिंगी सुळक्या पर्यंत पोहचले,,........... तिथे गेल्यावर मात्र १५-२० मिनिटे विश्रांती घेतली आणि अतिशय अरुंद अशा पायवाटेतून वार्याचा जोर कमी झाल्यावर सुळक्याच्या खालची गुहा बघायला गेले.......... खरच तिथे जाताना एक सेकंद काळजाचा ठोका चुकलेला पण जेव्हा तिकडून परत सुखरूप पणे गुहा बघून आले तेव्हा सगळी भीती नाहीशी झाली...............आता मात्र सगळ्या शेवट पर्यंत पायर्या होत्या, भल्या मोठ्या होत्या एक पायरी चढली कि अर्ध्या मिनिटा नंतर दुसरी असे करत करत जो शेवटचा rock patch होता तिथे पोहचले आणि दगडावर बसले, ते बघूनच हात आणि पाय ठार ठार कापायला लागलेले  पण "इच तेथे मार्ग " या म्हणी नुसार जेव्हा ते काहीही करून चधय्चेच असे ठरवून हाताने दगड पकडला तेव्हा अंगात एक प्रकारचे बळ आले आणि 3stape  पूर्ण  झाल्यावर मात्र जेव्हा डावा पाय ठेवायला जगच नवती तेव्हा काकांच्या खांद्यावर पाय ठेऊन तो patch  पुरण केला आणि ५मिनित तिथेच बसले आणि देवाला नमस्कार केला...........वरती गेल्यावर झेंडा लाऊन फोटो काढले आणि घोषणा  दिल्या........... गडावर धान्याचे कोठार , मंदिर आणि बुरुज बघण्य सारखे आहेत , ते बघायला जाताना भांडग खात खात जात होतो, गडावरून इतर जवळपासचे गड बघितले आणि धान्याचे कोठार बघायला निघालो तेव्हा मात्र राकेश आणि  रोहन  च्या मदतीने दगडावरून जायचा थरारक अनुभव अनुभवला पण त्यामुळे वरती जायला वेळ लागला म्हणून सागरच्या ओरडण्याचा आवाज एकू येत होता, पण काहीही झाले तरी त्याच वाटेने जायचे असे ठरवून आम्ही १०मिनिते उशिरा वरती पाण्याच्या टाक्यांच्या इथे पोहचलो पण त्या दगड वरूनच गेलो...........तिथून परत वरती झेंड्याच्या इथे गेलो आणि आसपासच्या परिसराचे डोळे भरून दर्शन घेतले तेव्हा मनाला समाधान वाटले, एवढ्या कष्टाने वरती पर्यंत आलेल्याचे चीज झाल्या सारखे वाटले........ ......तिथून खाली धान्याच्या कोठार बघायला गेलो. ते तर पुरण खडकात आणि कोणालाही पटकन दिसणार अन्ही अशा ठिकाणी होते......ते बघितल्यावर पूर्वीच्या लोकांच्या बुद्धिमत्तेची जाणीव पटली कित्ती उचा असेल याची अनुभूती येते..............जाताना मुख्य दरवाज्याचे दर्शन घेऊन परत गड उतरायला सुरवात केली....... उतरताना मात्र सावकाश गड उतरला.........खाली आल्यावर जेवण करून ट्रेकची सांगता केली.

Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख