लहानांच्या जगात
पुण्यातून कोल्हापूरला येताना माझ्या शेजारी एक ११-१२ वर्षाची मुलगी बसलेली. मी पुस्तक उघडून वाचायला सुरु केले तर तिने उत्सुकतेने प्रश्न केला, "काय वाचतेस ताई?" मी म्हंटल, "अच्युत गोडबोलेंच आत्मचरित्र वाचतीये" तिला कितपत कळल माहिती नाही पण ती फक्त माझ्याकड बघून हसली आणि पुस्तकात डोकावायला लागली. ५मिन नि माझ्या लक्षात आले तिला माझ्याशी बोलायचं म्हणून मी पुस्तक बंद करून तिला विचारला कितवीत आहेस? नाव काय? अशी ओळख होत गेली. मग दिवाळीत काय काय करणार? अस विचारल्यावर म्हणाली, " आज्जी कड जाणार खूप मज्जा करणार, खाऊ खाणार, नवीन ड्रेस घेणार, नदी वर जाऊन मस्त पाण्यात खेळणार. गुड्डू (तिचा मामे भाऊ) बरोबर लपंडाव, डब्बा express खेळणार." मी म्हंटल आणि फटाके नाही उडवणार? त्यावर ती म्हणाली,"नाही उडवणार." मी विचारल का ग? त्यावर ती म्हणाली "शाळेत यावेळी सांगितलय कि फटाके वाजवले कि प्रदूषण वाढते त्यामुळे आज्जी - आजोबा, छोटी छोटी मुले यांना त्रास होतो तर फटाके वाजवू नका त्यामुळे नाही वाजवणार फटाके." खूप निरागस पणे तिने उत्तर दिल होत हे. मी लगेच तिला "Good Girl " म्हंटल. तर त्यावर ती म्हणाली, " आमच्या घरी पण बाळ आहे तर त्याला पण त्याचा त्रास होईल, आणि पप्पा पण म्हणाले नको घ्यायला फटाके म्हणून नाही घेणार." खरच एवढं शहाणपण आल कुठून हिच्यात अस २मिन माझ्या मानत प्रश्न आला. पण यावरूनच समजले कि लहान मुलांच्या मनावर घरातल्यांचा आणि शाळेचा प्रभाव जास्ती असतो. मग आमच बोलन दिवाळी सुट्टीचा शाळेचा अभ्यास काय इकडे गेला. त्यावर ती म्हणाली माझा अभ्यास कालच पूर्ण झाला. खूप गोंडस आणि निरागस होती ती. मी म्हंटल मझ्याकड एक गंमत आहे देऊ मी तुला, " नको." तिला वाटल मी तिला काही तरी खाऊ देतीये म्हणून ती नको म्हणाली असावी. मी म्हंटल बघ तुला आवडली तर घे नाही तर नको घेऊ. मी माझ्या bag मधून ग्रीटिंग होते ते काढले आणि तिला दिले. ती खूप खुश झाली. ती पटकन म्हणाली, " तुझे नाव लिही ना." मग मी हैप्पी दिवाळी व माझे नाव घालून ग्रीटिंग दिले तिने लगेच तिच्या आज्जी कडून chocklet घेऊन मला दिले आणि thank you म्हंटले. इतके मस्त वाटले ना. जाताना तिने आठवणीने Flying kiss दिला व ती निघून गेली. ती गेल्यावर घरी येई पर्यंत मी तिच्याच विचारात होते. अजूनही तिने दाखवलेला समजूतदारपणा आठवला कि तिला सलाम करावासा वाटतो.
दिनांक: २१/१०/२०१४
Comments
Post a Comment