नातवंडांची आज्जी
आज्जी म्हणजे सखी असते, घराला तीच बांधून ठेवते
तिच्यामुळे घराला घरपण असते, सगळ्या पाहुण्यांची वर्दळ असते.
आई बाबा नसताना सांभाळणारी तीच असते,
म्हणूनच ती नातवंडांना खूप जवळची असते.
आई बाबांच्या मारा पासून वाचविणारी तीच असते
पण नंतर रागवून समजणारी पण तीच असते.
देवळात जाते, भजनाला जाते, येताना आठवणीने नातवाला खाऊ आणते
खाऊ देताना मात्र बजावून सांगते, "मोठ्यांचे सगळे एकायचे असते."
झोपताना कुशीत घेते, छान छान गोष्टी सांगते
झोप लागलेली कळल्यावर, अंगावर पांघरून घालते.
नातवंडां साठी ती प्रेमळ आज्जी असते
तिच्या प्रेमाची ऊब च वेगळी असते
म्हणून तिच्या साड्यांची गोधडी नातवंडांना प्रिय असते.
सौ. गौरी निखिल उपासनी
दिनांक - १ मे २०२३
Comments
Post a Comment