एकटच राहावं बाई.... आपण आणि आपलं आयुष्य हेच बरे बाई
कधी कधी वाटतं एकटच राहावं बाई,
कोणाचाच विचार करून काहीच फायदा नाही.
आपल आयुष्य आपणच जगायचं असतं, सुख दुःख दुसऱ्यांना सांगितली तरी भोगायच एकट्यानेच असत
म्हणून असं वाटतं, एकटच राहावं बाई....
सर्वांच्याच आयुष्यात सुख दुःख असतात, पण आपली दुःख आपल्यालाच अभाळा एवढी वाटतात
सुख वाटल्याने दुप्पट वाढते आणि दुःख सांगितल्याने कमी होते
पण मला मात्र असे काही कधी जाणवलेच नाही.
म्हणून असं वाटतं एकटच राहावं बाई......
नको बंधनं, नको अपेक्षा त्यामुळे वाटतो एकटेपणाचा बरा.
स्वतःच्या मर्यादा स्वतःच अखायच्या, प्रयत्नांना बळ देऊन उंच उडायचा प्रयत्न करायचा.
जास्ती विचार कोणाचाच करायचा नाही,
आपण आणि आपलं आयुष्य हेच बरं बाई.....
- सौ . गौरी निखिल उपासनी
Comments
Post a Comment