माणुसकीने वागणे हेच उचित राही

सासर काय माहेर काय सगळेच सेम असते
सहवास जसा वाढेल तशी सर्वांशी गट्टी जमते

चार भिंतीतून बाहेर पडले की बाहेरच्या जगाशी ओळख होते
तेव्हा माणसाला अनुभवातून शहाणपण शिकायला मिळते

नाती रक्ताची असो किंवा नसो, जसाश तसे वागायचे असते
मान अपमान सोडून स्वाभिमाना साठी झटायचे असते

कधी कधी घरचीच माणसे पाय खेचून पाडतात
पण तेव्हा मित्र मैत्रिणी आपल्याला त्यातून सावरतात

आई वडील असे पर्यंत माहेर सुखाचेच असते
पण नंतर पण भावाकडे हक्काने जायचे असते

मुलीला तर हक्काची दोन घरे असतात
' मी आहे म्हणून इथे राहती आहे ' असे कितीही घोकले तरी
तीच आपली हक्काची माणसे असतात

माणसांची उणीव कधीच भरून निघत नाही
म्हणून माणुसकीने वागणे हेच उचित राही

- सौ. गौरी निखिल उपासनी, नाशिक
दिनांक २५ ऑगस्ट २०२३




Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख