बाळाचे घर

काल माझ्या बाळाने बनवले स्वतःचे घर
दोन खुर्च्या ठेऊन त्यावर पसरली  एक चादर
त्याच्या खाली ठेवली त्याची खेळणी पसाभर
Ironman, Spiderman खेळत होते त्याच्या बरोबर

छोट्यांच्या राज्यात असतात प्राण्यांची घरे
स्वयंपाक करतात सगळे मिळून बरे
हत्ती शेतातून आणतो कणसे, मीठ साखर गाढव आणते 
Ironman पेटवतो चूल, सर्वजण मिळून पितात गरमा गरम सूप

मध्येच Hulk बरोबर चालायची मस्ती
बाईक वरून जायचे दोघे long drive वरती
मध्येच खेळायचे चेंडू फळी, त्यावरून व्हायची मारामारी
मग यायची पोहायची लहर, लगेच पळायचे पाण्याच्या टाकीवर

इकडून तिकडे चालू होती धमाल, खेळ बघताना वाटली कमाल
दिवसभर खेळून सगळे दमले
बाळाच्याच घरात पटकन निजले.




Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख