आजची भाऊबीज

भाऊबीज म्हणजे भावा बहिणीचा सण
आनंदाने भेटून साजरा करायचा तो क्षण
काही वर्षा पूर्वी बहिणीला आणायला जाणारा भाऊ
आता परदेशी पाठवतो फराळ आणि खाऊ
बहीण पण खुष होऊन सांगते रील मधून साऱ्या जगाला
मला आईच्या हातचा फराळ कॅनडाला मिळाला
कसा असतो ना भावा बहिणींचा प्रेमाचा जिव्हाळा
भाऊ पण म्हणतो आता ऑनलाईन ओवाळा
तू तिकडे मी इकडे शरीराने असलो लांब तरी 
टेक्नॉलॉजी ने केलंय आपल्यातलं अंतर कमी फार
आता दोघे कमवते झालो म्हणून देते मी रिटर्न गिफ्ट
पण लहानपणी आई बाबा कडून हट्टाने माझ्यासाठी बार्बी घेऊन द्यायचास तेच माझे स्पेशल गिफ्ट
असेच घेऊ समजून आपण एकमेकांना
भाऊबीजेच्या दिवशी उजळवू साठवणीतल्या भावना.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !!

 





Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख