जनरेशन आणि त्यांची आवड

कोण म्हणते ही जनरेशन फक्त मोबाईल घेऊन बसते???
मोबाईल बरोबरच त्यांना ग्राऊंडवर खेळायला आवडते,
मांजरी चे आणि बोक्याचे आवाज असे काढतात की 
जणू खरेच मांजर आणि बोके आहे भांडतात

मित्र मैत्रीणीना जमवून अंगणात चिखलात खेळायला आवडते
दिवाळीत आई ताईच्या मदतीने किल्ले पण बनवते
मोबाईल वरचे नृत्य व reels बघून तसे करायला आवडते
जेवताना शाळेतल्या मजा आणि तक्रारी पण सांगते
कोण म्हणते ही जनरेशन फक्त मोबाईल घेऊन बसते?

आज्जी शी गाण्याच्या भेंड्या पण  खेळते,
काका बरोबर  चेंडू फळी पण  खेळते,
फुटबॉल चा  चाहताच आहे तर ताई बरोबर बुद्धिबळ पण खेळते
सायकल घेऊन  भटकायला पण आवडते
उंच उंच किल्ल्यावर जाऊन वीरांच्या गोष्टी ऐकायला पण आवडते
कोण म्हणते ही जनरेशन फक्त मोबाईल घेऊन बसते??

रामायण महाभारत  पाहायला आवडते
त्या गोष्टी मित्रांना सांगायला पण आवडते
वर्गात मित्रांना बरोबर दंगा पण तेवढाच करते
वृत्तपत्रातील कोडी चुटकी सरशी सोडवते

संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभं करोति म्हणते
रामरक्षा मारुती स्तोत्र  रोजच म्हणते
भगवतगीता अध्याय १५ वा चे पाठांतर करते
पणजोबा आजोबांच्या गोष्टी खूप वेळा एकते
कोण म्हणते ही जनरेशन फक्त मोबाईल घेऊन बसते??







Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख