माहेर तसच सासर
आई नसली की माहेर रिकाम वाटतं
सासू नसली की सासर पण खायला उठत.
वडील नसले की जसा आधार नाहीसा होतो
तसाच सासरे नसले की आशीर्वादाचा हात पाठीवर नसतो
भाऊ माझा पाठीराखा असतो
तसाच दिर माझा काळजी घेणारा असतो
बहिणीची माया ही वेडी असते
तशीच नणंदेचे प्रेम कधीच अटत नसते
जसे माहेर मला लाडाचे तसेच सासर मला प्रेमाचे असते.
सगळे आपल्या वागण्यावर आणि मानण्यावर आहे.
Comments
Post a Comment