जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा २०२४

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे जरी असले, 
तरी त्या स्त्रीच्या मागे सुद्धा घरातील सर्व कुटुंबीय सदस्य असतात
घर हे फक्त भावनिक क्षणांवर आधारलेले असते
तिथे पैसा आणि प्रसिद्धी याचा काहीही संबंध नसतो
प्रेम द्या आणि प्रेम घ्या असे पूर्वजांनी म्हंटले आहे त्याच प्रमाणे
जर आपण प्रेम दिले तरच आपल्याला प्रेम मिळेल.
नोकरी करून घर सांभाळणाऱ्या महिला ह्या ग्रेट असतातच
पण फक्त घर सांभाळणाऱ्या गृहिणी ह्या त्यांच्या पेक्षा जास्त ग्रेट असतात.
कारण त्यांच्या २४ तास सहवासाचा परिणाम हा पूर्ण घरावर होत असतो, 
तिथे गेल्यावर ते घर प्रसन्न असेल तर ते फक्त आणि फक्त त्या स्त्री मुळेच.
स्त्री कडे प्रेम भावना ही उपजतच असते त्यामुळे तिला
फक्त तुम्ही खत पाणी व्यवस्थित दिले की ती बहरते, खुलते आणि फुलून  संसार सुगंधित करते.
पण जरी खत पाणी व्यवस्थित मिळाले नसले तरी ती तिच्या मुलांना ( फळा फुलांना) आनंदी ठेवण्यासाठी अहो रात्र प्रयत्न करत असते.
खास माझ्या आईना व अशा सर्व परिचित अपरिचित महिलांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

- गौरी निखिल उपासनी
दिनांक ८ मार्च २०२४

Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख