मोदी सरकार २०२४

काल लोकसभा निवडणुक २०२४ चा निकाल लागला आणि वाईट वाटलं. भाजप ला २४० च सीट मिळाल्या. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात भारतात जे काही केले ते आत्ता पर्यंत भारतासाठी कोणी केले असेल असे वाटत नाही. काय केले मोदींनी?? १) सर्वांना बँकेत खाते काढायला प्रोत्साहन दिले, २) मुंबई मधले दहशतवादी हल्ले बंद केले ३) अख्या जगात उपासमारी आणि टंचाई असताना भारतात सर्वसामान्य पर्यंत झळ पोहचू दिली नाही. ४) बेरोजगार युवकांना रोजगार संधी मिळवून दिल्या ५) गृहिणींना घरबसल्या उद्योग करण्याचे प्रोत्साहन दिले ६) चांद्रयान -३ अवकाश यान दक्षिण ध्रुवावर उतरवणार भारत पहिला देश ठरला ७) जम्मू काश्मीर मधील ३७० कलम उठवले ८) अयोध्येत श्री राम मंदिर बनले ९) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (आदिवासी) याची पहिल्या राष्ट्रपती पदा साठी नियुक्ती झाली 
हे फक्त ठळक मुद्दे मी मांडलेत जे मला आठवतायत अजून असे बरेच काही त्यांनी केले. अरे ज्यांनी स्वतःला १० वर्षात १दिवस आजारी सुद्धा पडू दिले नाही, स्वतःच्याप्राणप्रिय आई ची प्राण ज्योत मालवल्यावर काही तास तिथे काढून परत भारत देशाच्या परिवारासाठी दिल्लीत रुजू झाले अशा पंतप्रधानां ना ४०० पार होण्याची अपेक्षा असताना ३०० सुद्धा गाठले नाहीत म्हणजे भारतातली जनता किती अशिक्षित आणि पैशाला हापापलेली आहे हे यावरून समजले. पण काहीही झाले तरी माझा विश्वास आहे ३ऱ्या वेळी पण मोदी सरकारच येईल भले नाईलाजास्तव त्यांना इतरांची मदत घ्यावी लागेल पण एवढेच म्हणावेसे वाटते की मोदी है तो मौकिन है..... जय हिंद जय श्री राम 

Comments

Popular posts from this blog

वडील - आठवणी रुपी ठेवा

सायबर क्राईम स्टोरी

अप्रतिम लेख